जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरातआजपासून वस्त्र संहिता लागू

17
Clothing code applicable at Shree Khandoba temple of Jejuri from today

Pune Jejuri : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून (ता. १० मार्च २५) वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे.

याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री. अभिजीत देवकाते म्हणाले की, “मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.

देवस्थानच्या भंडारा प्रसाद निर्मिती केंद्राचा शुभारंभ

श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी च्या वतीने आज पासून ” भंडारा प्रसाद निर्मिती केंद्राचा देखील शुभारंभ करण्यात आला. हा भंडारा प्रसाद भाविक – भक्तांनी देवाला मनोभावे अर्पण केलेल्या भंडाऱ्यापासून तयार करण्यात येणार आहे. खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना निःशुल्क हा ” भंडार प्रसाद ” देण्यात येणार आहे. भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा