या १० राज्यात कोरोनाचा सर्वात अधिक कहर

नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर २०२०: देशात कोरोनाचा आलेख झपाट्यानं वाढत आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४,०५९ नवीन रुग्ण आढळले. तर २४ तासात ५११ संक्रमित लोकांनी आपले प्राण गमावले. देशभरात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. राज्य सरकार त्यांच्या पातळीवर नवीन निर्बंध लादत संसर्ग थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७७% नवीन प्रकरणं आणि ७६% नवीन मृत्यूची नोंद झाली आहे महत्त्वाचे म्हणजे यात दिल्ली आघाडीवर आहे.

या १० राज्यात एका दिवसात (गेल्या २४ तासात) सर्वाधिक प्रकरणं सापडली

दिल्ली – ७,७४६
केरळ – ५,२५४
महाराष्ट्र – ५,७५३
पश्चिम बंगाल – ३,५९१
राजस्थान – ३,२६०
उत्तर प्रदेश – २,५८८
हरियाणा – २,२७९
छत्तीसगड – १,७४८
तामिळनाडू – १,६५५
आंध्र प्रदेश १,१२१

राजधानी दिल्लीत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता चाचणी धोरणात बदल करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या मते, दिल्लीत प्रथमच आरटीपीसीआर चाचणीची संख्या ऑंटीजन चाचणी च्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे. दिल्लीतील डोअर टू डोअर सर्व्हेक्षण पुन्हा सुरू झालं आहे. तथापि, बेड्सबाबत आयसीयू अवघड आहे. एलएनजेपी हॉस्पिटलचे ४३० आयसीयू बेड भरले आहेत. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत ४०० नवीन आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, २ हजार रुपयांच्या दंडाचा परिणाम देखील दिसून येतो, मस्त न घेता निघणार्‍या लोकांची संख्या कमी झाली आहे.

या राज्यांमध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यू (गेल्या २४ तासात)

दिल्ली – १२१
महाराष्ट्र – ५०
पश्चिम बंगाल – ४९
उत्तर प्रदेश – ३५
केरळ – २७
हरियाणा – २५
तामिळनाडू – १९
छत्तीसगड – १९
पंजाब – १९
हिमाचल प्रदेश – १९

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा