१४ वेळा रक्तदान करणारे गणेश बाबासाहेब गायकवाड यांना कोरोना योध्दा पुरस्कार

बकोरी, २५ डिसेंबर २०२०: डोंगरगाव येथील युवक गणेश बाबासाहेब गायकवाड यांनी आजपर्यंत १४ वेळा रक्तदान केले २ वेळेला प्लाजमा दान केले व प्लाझमा दान करणेबाबत नागरिकांमध्ये समज गैरसमज होते त्याबाबत त्यांनी जनजागृती केली.
करोना काळात गावात स्वत्ता पंप घेऊन फवारणी करणे, नागरीकांना मदत करणे, त्यामध्ये त्यांना स्वतःला व कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली तरी सुद्धा न घाबरता त्यातुन बाहेर निघुन पुन्हा प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे. आले त्यामुळे अशा तरुण युवकाचा सन्मान तर झालाच पाहिजे, असे माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहीरट यांनी बोलताना सांगितले.
आज त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने  बकोरी येथील माहिती सेवा समितीच्या कार्यालयात सन्मानित करण्यात आले. सन्मान माहिती सेवा समितीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या हस्ते देण्यात आला.
त्यावेळी उपस्थितामध्ये डोंगरगावचे युवक कार्यकर्ते अमित गायकवाड, माहीती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहीरट, अभिजीत काटे, विक्रम गडदे, सागर जाधव, संदीप कोलते, देवेंद्रजी थत्ते, धनराज वारघडे, पोलीस काॅंस्टेबल संतोष बडे साहेब हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा