देशात कोरोनाचा जोर ओसरतोय…..

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२०: सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आजही अनेक देश या व्हायरसशी लढा देत आहेत. मात्र, भारतात आता कोरोना नियंत्रणात येत आसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. देशभरात आनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत आहे.

देशात सध्या कोरोना रूग्णांची संख्या ही १ कोटीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे आणि आत्ताचा हा क्षण कोरोना लढाईतील महत्वाचा असून नागरिकांनी सहकार्य केलं तर लवकरच यावर मात करता येईल. सरकारच्या नियमांचे पालन करणे हा एक उपाय कोरोनाला रोखू शकतो ज्याचा परिणाम सध्या देशात दिसून आला आहे.

भारताचा रिकव्हरी रेट हा जगभरातील सर्वात जास्त आहे. भारतात कोरोना रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.१२% झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. तसेच लवकरच कोरोना लस देखील भारतीय नागरिकांना मिळाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने जारी केलेल्या आकडेवारीत सध्या देशात कोरोनाचे ३,३९,८२० कोरोना रूग्ण ॲक्टीव आसून १,४३,७०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तसेच आतापर्यंत देशात ९४,२२,६३६ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी पणे मात केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा