रंगभूमी जगायला शिकवणारा दिगवंत हारपला……

मुंबई, ५ ऑगस्ट २०२०: ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा फैझल अलकाझी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अलकाझी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतात थिएटर लोकप्रिय आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी अलकाझी नेहमी आठवणीत राहतील. कला आणि संस्कृतीच्या जगात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

अलकाझी यांचे वडील सौदी अरेबियातले होते तर आई कुवेतमधील होती. त्यांना ९ भावंडे होती. त्यांचं बालपण पुण्यात गेलं. फाळणीनंतर अलकाझी यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं. मात्र अलकाझी यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

१९६२ ते १९७७ या कालावधीत ते नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे संचालक होते. १९४० च्या दशकात ते मुंबईत आले आणि अल्पावधीतच एक उत्तम अभिनेते म्हणून परिचित झाले.

अलकाझी यांच्याकडे भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून पाहिलं जातं. उत्कृष्ठ संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य यात ते पटाईत होते. त्यांनी ग्रीकच्या शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रीक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटकं भारतीय रंगभूमीवर आणली. तसेच त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अलकाझी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा