रयत शेतकरी संघटनेच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर ढवळे यांची निवड

शिरूर, २५ डिसेंबर २०२०: महाराष्ट्र मध्ये ॲड. बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर काम करत आहे. राज्यात रयत शेतकरी संघटनेच्या सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर सुनिल ठोसर पाटील यांनी शेतकरी कामगार शेतमजूर यांच्या विकास कामावर भर दिला आहे.
राज्यात सर्वत्र संघटना वाढ पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या आणि बीड सह सर्व जिल्ह्यात कोरोना प्रादूर्भाव असूनही संघटनेचे सरचिटणीस सुनील ठोसर पाटील अहोरात्र काम करीत आहेत. बीड जिल्हा शिरूर कासार तालुक्‍यातील ज्ञानेश्वर विठ्ठलराव ढवळे यांच्या समाजातील कार्याची दखल घेऊन आणि त्यांचे शेतकऱ्यांसाठी असणारे तळमळीचे कार्य पाहता ज्ञानेश्वर ढवळे यांची शिरूर (का) तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आलेलीआहे.
त्यांच्या निवडीचे पत्र शेतकरी संघटनेचे राज्याचे सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी त्यांना दिनांक २३ डिसेंबर रोजी सुपूर्द केले आहे. आणि त्यांच्या राजकीय सामाजिक शेतकरी कामगार या कार्यासाठी पुढील शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यावेळी माझ्या दिलेली जबाबदारी संघटनेचे सर्वेसर्वा मा. ॲड. बापूसाहेब देशमुख आणि राज्याचे सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडील असे ज्ञानेश्वर ढवळे यांनी बोलताना सांगितले आणि रयत शेतकरी संघटनेचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा