औरंगाबाद, दि. २३ मे २०२०: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाव राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. आपल्या समस्या व तक्रारी इथून पुढे माझी पत्नी सौ. संजना जाधव यांच्याकडून पूर्ण करून घ्याव्यात असे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे .
“निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला आहे . आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल.” असं जाधव म्हणाले .
पुढे ते म्हणाले की, “प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या पण याचा अर्थ असा नाही की काही वेगळ्या गोष्टी घडत असतील. मी संजना यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायबान जाधव यांच्या आशिर्वादाने आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात त्या निश्चित उत्तुंग भरारी मारतील.”
न्यूज अनकट प्रतिनिधी