औरंगाबाद, 8 जून, 2022: औरंगाबाद मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज होणार आहे. या सभेची जय्यत तयारी झाली असून आता सगळ्यांचं लक्ष सभेकडं लागलंय. यावेळी उद्घव ठाकरे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलणार का? हे या सभेत समजेल.
या सभेसाठी ट्रक भरुन माणसं नेत असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा लवंगी फुटला तरी खूप आहे, असं म्हणत सभेवर हास्य केलंय. सुभाष देसाई यांनी या सभेची तयारी पाहून ही सभा निर्विघ्न पार पडावी, यासाठी चंद्रकांत खैरे यांनी ग्रामदेवतेची पूजा केली. या सभेत मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार, हे ही महत्वाचं आहे. त्यानुसार पुढील घडामोड होईल हे खरं.
या सभेत मुख्यमंत्र्याच्या मंचावर छत्रपती संभाजी राजे यांचा पुतळा ठेवण्यात आलाय. त्यानुसार नामांतर या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री सभा जिंकण्याचा प्रयत्न करतील असे भाजप नेत्यांना वाटत असल्याचे सूत्रांकडून समजते.
पण आता राज ठाकरेंच्या सभेनंतर मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार आणि कोणाला जवळ करणार हे आज संध्याकाळी समजेल. पण ही सभा जादू करेल का? हे सांगणे मात्र अवघड आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस