पुणे: हडपसर परिसरातील फुरसुंगीत एका जेष्ट नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना आज ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
नरसिंह विठ्ठल चव्हाण (वय ५५ ) असे खून झालेले नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी गावात एक जेष्ट नागरिकाचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मयत हे नरसिंह चव्हाण असल्याचे समजले. त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे हडपसर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.