MI vs DC Match Highlight Marathi : तिलक वर्माची शानदार अर्धशतकी खेळी,कर्ण शर्माची व मिचेल सैंटनरची दमदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इडियन्स इंडियन्सने आयपीएल २०२५ मधील मोठ्या थरारक विजयाची नोंद केली. अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटलचा १२ धावांनी पराभव केला. १९ व्या षटकांतील अखेच्या ३ चेंडूवर ३ विकेट्स घेत मुंबईने विजय मिळवला. यासह दिल्ली कॅपिटलला यंदाच्या हंगामातील पहिला पराभव पटकरवा लागला आहे.
नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटलने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मैदानात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात चांगली राहिली. त्यांनी ६ षटकांत ५० पेक्षा जास्त धावा केल्या. रोहित शर्मा कालच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल असे वाटले होते. मात्र, कालच्या सामन्यात देखील त्याला शानदार धावा करण्याचा सुर गवसता आला नाही. त्यानं १२ चेंडूत केवळ १८ धावा काढल्या. सलामीवीर रिकेल्टन ४० धावा करून बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने मुंबईचा तुरा सांभाळला. सूर्याने २८ चेंडूत ४० धावा तर तिलक वर्माने ३३ चेंडूत ६ चौकार व ३ षटकरांच्या मदतीने ५९ धावा ठोकल्या.याशिवाय नमन धीरच्या ३८ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्ली समोर २०६ धावांचे लक्ष ठेवले.
मुंबईने दिलेल्या २०६ धावांचा पाठलाग करताना दिल्लीला दीपक चहरने पाहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाणी पाजल आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण यानंतर करुण नायर आणि अभिषेक पोरेल यांनी वादळी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. १५ व्या षटकापर्यंत दिल्ली कॅपिटल हा सामना सहज जिंकेल अस वाटल होत. पण शेवटच्या ४ षटकांत मुंबई इंडियन्सने पलटवार करत सामना आपल्या ताफ्यात घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर