Waqf Amendment Act 2025 Supreme Court hearing: वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी आज दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यावेळी न्यायालय अंतरिम आदेशाच्या मुद्द्यावर निर्णय घेणार आहे.
काल या प्रकरणाची सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने तात्पुरत्या स्वरूपात तीन महत्त्वपूर्ण सूचना देत अंतरिम आदेशाचा प्रस्ताव मांडला होता.पहिल्या सूचनेनुसार न्यायालयांनी वक्फ म्हणून घोषित केलेल्या मालमत्तांना त्या वक्फ-बाय-यूसेज (प्रथेने वक्फ) असोत किंवा वक्फ-बाय-डीड कृतिद्वारे वक्फ सुनावणी सुरू असताना वक्फ यादीतून वगळले जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसऱ्या सूचनेनुसार, दुरुस्ती कायद्यातील त्या तरतुदीची अंमलबजावणी होणार नाही, ज्यामध्ये कलेक्टर एखादी मालमत्ता सरकारी आहे का याची चौकशी करत असताना ती वक्फ मालमत्ता मानली जात नाही.तिसऱ्या सूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, वक्फ मंडळे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिम असणे आवश्यक आहे, मात्र पदसिद्ध सदस्यांना एक्स ऑफिसो मेंबर यामधून वगळण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,राजश्री भोसले