कर्नाटक, २४ एप्रिल २०२३: कर्नाटकात सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतांनाच, आज सकाळी आयकर विभागाने येथील माजी मंत्री आणि कॉग्रेसचे पूर्व नेते गंगाधर गौडा यांच्या दक्षिण कर्नाटकातील बेलथंगडी येथील शिक्षण संस्थेवर देखील आयकरच्या आयटी विभागाने छापे टाकले. छापेमारीत मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कर्नाटकात विधानसभेसाठी येत्या १० मे रोजी मतदान होणार असून, १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसकडून प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, आयकर विभागाकडून माजी मंत्री आणि कॉग्रेसचे पूर्व नेते गौडा यांच्यावर करण्यात आलेली कारवाई धक्कादायक आहे.
आयकर विभागाने माजी कॉग्रेस नेते गंगाधर गौडा यांच्या निवासस्थानी आणि शिक्षण संस्थेवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छापा टाकला आहे. या छापेमारीत आयकरच्या आयटी विभागाकडून रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. भाजप सोडून गेलेल्या गौडा यांनी अलीकडेच रक्षित शिवराम यांच्याकडून काँग्रेसचे तिकीट गमावल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आयकर विभागाने आज ही कारवाई केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर