पुणे, ९ ऑक्टोबर २०२२ : भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशचा ५९ धावांनी पराभव केला, या विजयासह भारतीय महिला संघाने पॉइंट टेबल मध्ये पहिल्या स्थानावर झेप घेत आपलं स्थान आणखी बळकट केलं आहे.
मागील सामन्यांत भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर २४ तासात चांगले पुनरागमन झाले भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेत पाच सामन्यांपैकी चार विजयासह भारत आता उपांत्य फेरीत पोहचला आहे
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, यावेळी फलंदाजी करताना भारताने २० षटकात पाच विकेट्स गमवत १५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशला निर्धारित २० षटकात १०० धावावरच भारतीय महिला संघाने रोखले.
भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक ४४ चेंडूमध्ये ५५ धावांची खेळी केली. यामध्ये तिने पाच चौकार आणि दोन षटकार मारले, शेफालीव्यतिरिक्त कर्णधार स्मृती मंधना हिने ४७ धावा केल्या, तसेच जिमिहा रोड्रिग्स हीने ३५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तर बांगलादेश कडून कर्णधार निगार सुलताना हिने सर्वाधिक ३६ धावा केल्या, या धावा करताना तिने पाच चौकार ही मारले तिच्याव्यतिरिक्त फरगणा होक ३० आणि मुर्शिद खातून २१ यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज भारतीय गोलंदाजी समोर टिकू शकला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव