उरुळी कांचन येथे विलगिकरणासाठी महात्मा गांधी निसर्गउपचार आश्रमाची पाहणी

उरुळी कांचन, दि. १३ जुलै २०२०: पूर्व हवेलीतील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांच्या विलगिकरणासाठी जागा अपुरी पडत आहे. ऊरुळी कांचन येथील महात्मा गांधी निसर्गुपचार आश्रमाची जागा योग्य असल्याने त्याचा उपयोग विलगिकरणासाठी करावा अशी मागणी माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली होती.

मेलची ताबडतोब दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून तात्काळ रिपोर्ट पाठवावा असे हवेलीचे अधिकारी सचिन बारवकर यांना सांगितले होते. त्यानुसार आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी आश्रमाची पाहणी करून ही जागा योग्य असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले.

यावेळी सरपंच राजश्री वनारसे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.सुचेता कदम, डॉ. राजश्री सुर्यवंशी, माजी सरपंच भाऊसाहेब तुपे, हवेली तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सागर कांचन, जिल्हा परिषद सदस्य किर्ती कांचन, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा