इलेक्ट्रिक एसटीमुळे प्रवाशांना फायदा रोज सव्वादोन लाखांचा टोल वाचणार!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बसेससाठी राज्य सरकारने घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयामुळे महामंडळाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि ‘अटल सेतू’ वर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसेस आता टोल भराव्या लागणार नाहीत. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला दररोज तब्बल सव्वादोन लाख रुपयांचा फायदा होत आहे.

एकट्या पुणे विभागातून दादर, ठाणे, बोरिवली, मंत्रालय अशा मार्गांवर धावणाऱ्या ४८ ई-बसेसमुळे हा लाभ लक्षणीय ठरतो. ‘अटल सेतू’वर एका बसला ८३० रुपये टोल भरावा लागत होता. आता वाचलेल्या लाखो रुपयांमुळे प्रवासाचे तिकीट दर स्थिर ठेवण्यास मदत होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा प्रवाशांना होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे