बुरहानपूर, ४ ऑगस्ट २०२० : भारतातील विविध राज्यात आठवड्याला दोन ते तीन दिवसात मुलींवर आत्याचार होत असतात. समाजात गेल्या अनेक महिन्यापासून महिला आणि मुलींच्या आत्याचारात वाढ होताना दिसत आहे. समाजातील हि विकृतीच सध्या फार घातक असून आज घडीला देखील असे प्रकार थांबत नाही. ही भारताची फार मोठी शोकांतिका आहे.
मध्य प्रदेश मधल्या बुरहानपूर येथे रविवारी माय लेकीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकुण ६ जणांनी १२ वर्षाच्या चिमुरडीसह तिच्या आईला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला .हा बलात्कार शेतात घेऊन जाऊन करण्यात आला तर पिडित कुटुंबियांच्या घरातून पैसे आणि दागिने देखील घेऊन नराधम है पसार झाले आहेत.या घटनेमुळे शहराबरोबर संपुर्ण पोलिस प्रशासन देखील हदरले आहे.
निर्भया प्रकरणानंतर देखील बलात्कारांच्या घटनेत घट नसून वाढ होताना दिसत आहे. निर्भया प्रकरणाने झोपलेल्या देशवासीयांना पुन्हा एकदा जागवले खरे मात्र त्या नंतर अशा किती निर्भया झाला ज्यांच्या गुन्हांची नोंद ही आजही फाईलमध्ये धुळ खात पडली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी