संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती; भक्तीमय वातावरणात देहूतून प्रस्थान

18
Murlidhar Mohol Attends Tukaram Palakhi Sohala 2025
मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती;

Murlidhar Mohol Attends Tukaram Palakhi Sohala 2025: लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज देहूतून प्रस्थान झाले. या भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात, पुण्यातील लोकप्रिय नेते मुरलीधर मोहोळ यांनी पालखी सोहळ्यात दर्शनासाठी विशेष उपस्थिती लावली, ज्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वीच देहू नगरी विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमून गेली होती. पहाटेपासूनच वारकरी मोठ्या संख्येने देहूत दाखल झाले होते. याच मंगलमयी क्षणी, मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या प्रसंगी उपस्थितांशी बोलताना मोहोळ यांनी, “संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. या सोहळ्यातून मिळणारी ऊर्जा आणि प्रेरणा खूप मोठी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

मोहोळ यांच्या उपस्थितीने पालखी सोहळ्याच्या उत्साहात भर पडली. त्यांच्या साध्या आणि सहज स्वभावामुळे वारकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यंदाचा पालखी सोहळा हा एक आगळावेगळा उत्साह घेऊन आल्याचे दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे