मुंबई, १९ ऑगस्ट २०२०: सुशांत सिंग प्रकरण गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिले आहे. यावरून सेलिब्रेटिंग पासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वच ठिकाणी हेवेदावे व आरोप-प्रत्यारोप करणे सुरू आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टाने सदर प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. त्यामुळे आता राजकीय पटलावर यावरून जोरदार हेवेदावे सुरू झाले आहेत.
सध्या, या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिने माध्यमांसाठी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ” आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही “. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही,’ असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.
दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने मागील आठवड्यात प्रलंबित ठेवलेला निकाल आज मार्गी लावला आहे, आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांना सर्व माहिती सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देखील दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































