नीता अंबानी यांचा सन्मान: मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नरकडून गौरव

17

पुणे, १७ फेब्रुवारी २०२५: रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील योगदानाबद्दल मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नर मौरा हिली यांच्या हस्ते प्रतिष्ठित गव्हर्नर प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

बोस्टनमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात नीता अंबानी यांनी बनारसी साडी परिधान केली होती. शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत.

अलीकडील पुरस्कार

  • ‘ब्रँड इंडियामध्ये उत्कृष्ट योगदान’ पुरस्कार (इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स)
    • ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड (US-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम)
  • नीता अंबानी यांनी 40 वर्षांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अधिवेशन आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशन ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि कला-संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

फाउंडेशनने 55,550+ गावे आणि 77 दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. नीता अंबानी यांचा सन्मान प्रेरणादायी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा