ऑफिसच्या AC मुळे शरिरातील या भागांचे होते नुकसान

27

अनेक ऑफिसमध्ये एसीचं तापमान जाणीवपूर्वक कमी करण्यात येतं. अशावेळी तुमची त्वचा आणि केस दोन्ही खराब होतात. ओल्याव्याच्या अभावी तुमच्या चेहऱ्याचा रंगही बदलू लागतो. ज्यामुळे तुम्ही वयाच्याआधीच वृद्ध दिसायला लागता. चेहऱ्याचं ग्लॅमर संपू लागते.

डोळे कोरडे पडणे : वेळेपेक्षा अधिक वेळ एअर कंडीशनमध्ये बसल्यामुळे डोळे कोरडे पडण्याचा त्रास होण्याची भिती असते. याचे मुख्य लक्षणे म्हणजे डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे, खाज येणे ही आहेत.

कसे वाचाल : डोळे पाण्याने धूवावे. वेळोवेळी पापण्यांची हालचाल करावी.

ज्यॉइंटमध्ये त्रास : थंड वातावरणाचा परिणाम हा शरिरातील ज्य़ॉइंट्सवर अधिक होत असतो. यामध्ये गुढघे, हात, मान दुखणे या समस्या उद्भवू शकतात.

कसे वाचाल : तुमच्या ऑफिसमध्ये जर एसी असेल तर एका जागी जास्त वेळ बसणे टाळा. शरिराचा जो भाग दुखत असेल त्याची जास्तीत जास्त हालचाल करा.

श्वासाचा त्रास: एअर कंडीशनचे फिल्टर खराब झाल्यानंतर त्यातील घाणीमुळे श्वासासंबधी त्रास होऊ शकतो. यामुळे घसा दुखणे,सारख्या शिंका येणे हा त्रास होतो.

कसे वाचाल : शक्य झाल्यास ऑफिसमधील एअर कंडीशनरचे फिल्टर वेळोवेळी साफ करून घ्यावे.

डोके दुखणे : अधिक काळ एअर कंडीशनमध्ये बसल्यामुळे मांसपेशिंवर ताण येण्यास सुरूवात होते. यामुळे डोके दुखण्याचा त्रास होण्यास सुरूवात होतो. थंड वातावरणात अधिक वेळ बसणे टाळावे.

कसे वाचाल : कानामध्ये कापूस ठेवावा किंवा डोक्याला रूमाल बांधावा.