पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील नागरिकांसाठी आता मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार पीएमआरडीएच्या १९ सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, येत्या आठवड्याभरात यात आणखी १० नवीन सेवांची भर पडणार असून, एकूण २९ सेवांचा लाभ घरबसल्या घेता येणार आहे.
यामुळे नागरिकांना कार्यालयात जाण्याची गरज नसेल. विकास परवानगी, अग्निशमन ना-हरकत दाखला, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला आणि मालमत्ता हस्तांतरण यांसारख्या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टल आणि पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांना या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही सुविधा पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा देईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले












































