Pune footpath vendors encroachment: पुणे शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असली, तरी शहरातील अनेक रस्त्यांवर फळ, भाजी, कपडे किंवा गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रेत्यांनी सर्रासपणे दुकाने थाटलेली दिसून येत आहेत. वाहनांचे नियमबाह्य पार्किंग, पदपथावरील इलेक्ट्रिक खांबावरचे फ्लेक्स, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
नगर रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर चंदननगर परिसरात आणि जकात नाका येथे पदपथावर आणि मुख्य रस्त्यावर फळविक्रेते सर्रासपणे गाड्या लावून विक्री सुरू करतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दुसरीकडे, कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिर रोडवरील श्रीमान बस थांब्याजवळही हीच परिस्थिती आहे. यातील अनेकांकडे परवाने आहेत; मात्र ज्यांच्याकडे परवाने नाहीत, अशांवर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.
ही काही ठळक रस्त्यांवरील स्थिती असली, तरी शहरातील प्रत्येक भागात असेच चित्र दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांवर फळ, भाजी किंवा वस्तूंच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली दिसून येतात. अतिक्रमण पथक आणि कचरा पथक दिवसातून दोन-दोनदा जरी तेथून गेले, तरी त्या वेळेपुरते हे विक्रेते आणि फेरीवाले गायब होतात. काही वेळाने पुन्हा येतात आणि पुढे रात्री दहा, तर काही ठिकाणी साडेअकरापर्यंत तेथेच असतात. कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिर रस्त्यावर भाजीवाले आणि फळवाले आणि इतर विक्रेते यांचे अतिक्रमण इतके आहे, की पीएमपी बस वाहनांचे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.
अतिक्रमण पथक आणि कचरा पथक दिवसातून दोन-दोनदा जरी तेथून गेले, तरी त्या वेळेपुरते हे विक्रेते आणि फेरीवाले गायब होतात. काही वेळाने पुन्हा येतात व काही ठिकाणी साडेअकरा साडेअकरापर्यंत तेथेच असतात. त्यामुळे,महापालिका प्रशासनाने या विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे