Krantijyoti Savitribai Phule on her Death Anniversary: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनानिमित्त कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य प्रा.(डॉ) राजेंद्र घोडे, श्री. मुकूंद पांडे, डॉ. संजय देसले, डॉ. विलास आढाव आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी, वैभव वायकर