धक्कादायक: अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा हजार लोकांची उपस्थिती..!

आसाम, दि. ५ जुलै २०२०: देशात दिवसेंदिवस कोविड -१९ ची संख्या वाढत चालली आहे. सरकारसमोर कोविड -१९ च्या संकटा बरोबरच आर्थिक संकट देखील उभे राहत आहे. त्यामुळे सरकारने आता अनलॉक २ देखील जाहीर केले आहे. या दरम्यान सरकारने अधिक शिथिलता दिली आहे. मात्र यामुळे कोविड -१९ चे संकट आणखीन बळावण्याची शक्यता वाढली आहे. रोज वीस हजारांच्या पुढे नवीन प्रकरणे सापडत आहे आणि आता अशातच आसाम मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदाराच्या वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल दहा हजार लोक उपस्थित राहिले. या घटनेनंतर प्रशासनाने तीन गावे सील केली आहेत.

ही माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ जवळील तीन गावे सील केली आहेत. आसाममधील नागाव जिल्ह्यातील आमदाराचे वडील खैरुल इस्लाम यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले होते. खैरुल इस्लाम यांच्यावर दोन जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारा दरम्यान तब्बल दहा हजार लोक एकत्र जमले होते.

हा अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनूल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने लोक हजर असल्याचे दिसत आहे. नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती.

नागावचे पोलीस उपायुक्त जादव सैकिया म्हणाले की, या अंत्यसंस्कारा दरम्यान आमदारांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे तसेच लॉक डाउन मधील घालण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुढील संभाव्य धोका पाहता आजूबाजूची तीन गावे देखील सील करण्यात आले आहेत. लोकांनी सोशल डिस्टसिंग आणि मास्कसारख्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. आमदार इस्लाम यांनी द संडे एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “माझे वडील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांना मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या अंत्यसंस्कराबाबत आम्ही पोलिसांना कल्पना दिली होती. अंत्यविधीला लोकांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांनी अनेक वाहनांना माघारी पाठवले. तरीही इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा