मुंबई, २३ जून २०२० : कोराेनाच्या प्रसारामुळे २४ मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे देशातील सगळे व्यवहार, ठप्प झाले.
यामध्ये छोट्या दुकानदारा पासून ते मोठ्या कंपन्या , शाळांपासून कॉलेज पासून ते अनेक मोठ्या संस्थांपर्यंत सगळे बंद होते.
या मध्ये एक अशीही कंपनी होती जी मोठ्या प्रमाणावर सरकारला अार्थिक उत्पन्न ही देती व लोकांचे करमणूक ही करती, ती म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टी.
मागील ३ महिन्यापासून बंद असलेली ही कंपनी काही नियम व अटीवर सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. याच नियमांचे पालन करत आज सोनी मराठी वरील ” स्वराज्य जननी जिजामाता ” या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले आज चित्रिकरणाचा पहिला दिवस पार पाडला.
साधारणत: ७०-८० लोकांचे युनिट असायचे. आज मात्र फक्त ३३ जणच होते पण ते सर्व त्याच उर्जेने काम करत होते. तीन महिन्यांपासून कॅमेरा आणि शूटिंग सेट पासून लांब राहिलेली सगळी मंडळी आज खूप भावनिक होवून काम करत होती.
हे खूप सकारात्मक आहे या प्रयत्नातून चित्रपटसृष्टीतील सगळ्या गोष्टी हळू हळू पूर्वपदावर येतील, फक्त सुरुवात होणं महत्वाचं आहे असे सेट वरील सर्वांचे मत होते .
आता कोविड १९ ला सोबत घेऊनच काम करावं लागणार हे स्वीकारत ते सर्वजण काम करत होते. फक्त स्वत:ची काळजी आपण स्वत:च घेतली पाहिजे. यावेळी मालिकेचे दिग्दर्शक , DOP योगेश जानी, कैमेरामन विरधवल पाटील सहाय्यक कैमेरामन अंकूल शर्मा व मालिकेतील इतर कलाकार उपस्थित होते .
न्यूज अनकट प्रतिनिधी