२९ जानेवारी २०२५ मुंबई : प्रयगराज येथे मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर प्रदेश सरकारला घेरल आहे. आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या, “भाजपचे खासदार निरंजन ज्योती कुंभमध्ये उपस्थित आहेत तरी राज्याची तयारी चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.” व्यवस्थापन लष्करकडे सोपवावे अशी त्यांनी मागणी केली.
दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सुलभ व्यवसाय आणि देशाच्या वित्तीय तुटीच्या मुद्द्याला हात घातला. त्यांनी राज्य सरकारला गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून वित्तीय तूट व्यवस्थापनाबाबतच्या नीती आयोगाच्या अहवालाबाबतचा इशारा दिला. या अहवालावरून आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे सुळे म्हणाल्या,” अटल बिहारी वाजपेयी यांनी वित्तीय तूट व्यवस्थापनात नियम लागू केले होते. ते सर्व नियम FRPM कायदा २०१९ पर्यंत सुरळीत चालले. मात्र, त्यानंतर राज्य आणि केंद्र यांच्या खर्चावर किती नियंत्रण आहे असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी मागच्या अडीच वर्षांपासून हा मुद्दा मांडत आली आहे. वित्तीय तुटीत आपण तिसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर आलो आहोत असे त्या म्हणाल्या.
व्यवसाय सुलभतेच्या मुद्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली त्या म्हणाल्या की, ओडीसा आणि छत्तीसगड सारखी राज्य व्यवसायात महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. मग आपण का खाली जात आहे? इज ऑफ डूइंग बिझनेस हा एक निर्देशांक असून त्याद्वारे राज्यात किंवा देशात व्यवसाय सुलभतेचे मूल्यांकन केले जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर











































