नीरा ग्रामपंचायत सरपंचपदी तेजश्री काकडे उपसरपंचपदी राजेश काकडे

पुरंदर  ९ फेब्रुवरी २०२१: पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेजश्री काकडे तर उपसरपंचपदी काँग्रेसचे राजेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.याबाबतची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मोरे यांनी जाहीर केली.
पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते.तर १८ जानेवारीत मतमोजणी करण्यात आली होती. यामध्ये नीरा विकास आघाडीचे १०, चव्हाण पॅनलचे ४ तर  भैरवनाथ पॅनलचे ३ सदस्य निवडून आले होते.आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत  सरपंचपदासाठी नीरा विकास आघाडीच्या तेजश्री विराज काकडे व उपसरपंच पदासाठी आघडीचेच  राजेश अशोकराव काकडे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णयअधिकारी  मिलिंद मोरे यांनी दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.यावेळी ग्रामविकास अधिकारी मनोज ढेरे यांनी  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
निवडीनंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने माजी जी.प. सदस्य विराज काकडे, माजी सरपंच चंद्रकांत धायगुडे  माजी उपसरपंच  विजय शिंदे, दीपक काकडे,यांसह ग्रामस्थ उपस्थित होते..
 न्युज अनकट प्रतिनिधी :-  राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा