‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’तर्फे आयोजित शेकोटी संमेलनातील रंगतदार कथाकथनाने श्रोते मंत्रमुग्ध

42

पुणे, १७ जानेवारी २०२३ : ‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’तर्फे जिल्ह्यातील सर्व साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांच्या सहयोगाने नुकत्याच घेण्यात आलेल्या नाशिकमधील पहिल्यावहिल्या शेकोटी लोककला साहित्य संमेलनात नामवंत कथाकारांच्या उत्कृष्ट कथा सादरीकरणाने शेकोटी संमेलनातील कथाकथन सत्र रंगतदार झाले.

‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’तर्फे आयोजित शेकोटी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात कथाकथन सत्राने झाली. बाबूराव बागूल कथाकथन मंचावर झालेल्या कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कथाकार सप्तर्षी माळी यांनी भूषविले. संजय गोराडे, अलका दराडे, प्रशांत कोटकर, डाॅ. अंजना भंडारी, अलका येवले व सप्तर्षी माळी या नामवंत कथाकरांनी आपल्या कथा सादर केल्या. विनोदी, सामाजिक, कौटुंबिक कथा सादर करताना प्रत्येक कथाकारांनी आपल्या कथांमधून सामाजिक समस्या मांडून, प्रेक्षकांना कळत-नकळत एक संदेश दिला. डाॅ. अंजना भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘गिरणा गौरव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष सुरेश पवार, अश्विनी बोरस्ते, रवींद्र मालुंजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील