बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला

पुणे, १७ जून :  कोरोनाच्या पार्शवभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस रद्द झाल्या. मात्र या परीक्षांचे निकाल कसे लावणार, याची विद्याथ्यांबरोबर पालकांना ही धास्ती होती. मात्र ही तिढा अखेरीस सुटला असून आता बारावीच्या निकाल कसा लावणार हे आता स्पष्ट झाले आहे. सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. सीबीएसईने सांगितले की दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डचा निकालाच्या आधारावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाईल.
बारावीच्या अंतिम  निकालासाठी दहावी , अकरावीच्या अंतिम निकालाची मदत घेणार आहे. ३०:३०:४० अशा टक्केवारीनुसार हा निकाल लावण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने  स्पष्ट केले. सीबीएसईचा निकाल ३१ जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिली. त्यामुळे आता बारावीच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा