रमजानचा पवित्र महिना;बाजारात दाखल झाले पन्नास प्रकारचे खजूर

34
Ramjan Eid Pune Ramjan Eid Fifty types of dates
रमजानचा पवित्र महिना;बाजारात दाखल झाले पन्नास प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत.

Pune Ramjam : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला रविवारपासून (दि. २) सुरुवात झाली आहे. या पवित्र महिन्यात, मुस्लिम बांधव महिनाभर रमजानचे रोजे (उपवास) करतात. खजूर खाऊन उपवास सोडण्याची परंपरा असल्यामुळे, बाजारात तब्बल पन्नास प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत.

पुणे शहर सिरत कमिटीच्या बैठकीत, देशभरात कुठेही चंद्रदर्शन न झाल्यामुळे रविवारपासून रमजानचा पहिला रोजा होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, रविवारपासून रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे मुस्लिम बांधवांकडून खजुराला मोठी मागणी होत आहे.

सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान, मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन, मौलाना जमीरूद्दीन, हाफिज ऐजाज अशरफी, हाफिज जावेद अशरफी, सिराज बागवान यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. रमजानचा पवित्र महिना सुरु झाल्यामुळे, घरोघरीही उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने सामूहिक नमाज पठण होणार असून, मशिदींमध्येही जय्यत तयारी करण्यात आली आहे, असे सीरत कमिटीचे सरचिटणीस रफिउद्दीन शेख यांनी सांगितले.

या पवित्र महिन्यात, खजुरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बाजारात दाखल झालेले विविध प्रकारचे खजूर, रोजा सोडण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा