जीवनाचा प्रवास विमानातच थांबला; रांचीहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका

पुणे, १९ मार्च २०२३ : रांचीहून आलेल्या इंडिगोच्या विमानातून एका प्रवाशाने उड्डाण केलं. काही वेळाने आत बसलेल्या या वृद्ध प्रवाशाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी पायलटने पुण्याऐवजी जवळच्या नागपूरच्या विमानतळ प्राधिकरणाशी बोलणी केली. त्यानंतर नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. वयही सत्तरीहून अधिक होतं. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. पण जीव वाचवण्यासाठी पायलटने जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावलं.

पुण्याला पोहोचायला उशीर झाला होता. नागपूर जवळच होतं. अशा परिस्थितीत सहवैमानिकाने नागपूर विमानतळाच्या एटीसीशी संपर्क साधला. पायलटने इमर्जन्सी लँडिंगसाठी एटीसीकडं परवानगी मागितली. एटीसीने ग्रीन सिग्नल दिला. जे विमान पुण्यात उतरायचं होतं ते रात्री १०.१२ वाजता नागपुरात उतरलं. विमानतळावर आपत्कालीन व्यवस्था सज्ज होती. वृद्ध प्रवाशाला तेथून तातडीने किम्स-किंग्सवे रुग्णालयात नेण्यात आलं.

किंग्सवे हॉस्पिटलचे डेप्युटी जनरल (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी सांगितलं की, वृद्ध प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात येताच त्यांची तपासणी करण्यात आली. पण ते आधीच मरण पावले होते. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांचा मृतदेह इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा