इंदापूरकरांचा एकच निर्धार पोलिओ करणार हद्दपार – मा.सभापती प्रविण माने

इंदापूर ३१ जानेवारी २०२१: यादिवशी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून त्यामध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना डोस पाजण्यात येतो.
यानिमित्ताने आज आपल्या पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या शुभहस्ते बालकांना पोलिओची लस देऊन या लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली.
नव्याने जन्माला येणाऱ्या पिढीला पोलिओच्या विळख्यातून बचावण्यासाठी हे टीकाकरण मोहीम आवश्यक असून आपण समस्त इंदापूरकरांनी एकच निर्धार करून पोलिओ हद्दपार करायला हवा असे उद्गार याप्रसंगी माने यांनी काढले.
तसेच तालुक्यातील ऊसतोड कामगार व MIDC कामगार व इतर वाड्या-वस्त्यांवरील बालकांनाही हा डोस उपलब्ध करून देण्यात यावा, एकही बालक या मोहीमेपासून वंचित राहू नये, या आशयाच्या सूचनाही माने यांनी यावेळी केल्या.
आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.रणजित जाधवर, आरोग्य सेवक अतुल जाधव, आरोग्य सहाय्यीका श्रीमती लेंढे, आरोग्य सेविका श्रीमती कांबळे, राहुल रणधीर, संजय करगळ, विजय जाधव, बबलू जाधव
यांसह आरोग्य सेवक, सेविका, आशा भगिनी उपस्थित होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा