पोलीस पाटलांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक

पुरंदर, २५ डिसेंबर २०२०: कोरोना काळात सर्वच  गावातील पोलीस पाटलांचे काम उल्लेखनीय आहे. पोलीस पाटलांनी कोणत्याही सुरक्षे शिवाय कोरोना निर्मूलनासाठी मोठा सहभाग घेतला. शासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पारपडल्या. त्यामूळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  अभिनव देशमुख यांनी पोलीस  पाटलांना प्रशंसापत्र  देऊन  सन्मानित केले.
 
काल दि.२४ रोजी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांना प्रशंसापत्र देऊन  सन्मानित करण्यात आले. यावेळी महाडिक म्हणाले की, “राज्यात महामारीच्या काळात पोलीस पाटलांनी आपापल्या गावात जबाबदारीने काम केले त्यामूळे पोलीस,महसूल व आरोग्य विभागाला मोठी मदत झाली.”
      
या कामामुळे प्रभावित होऊन पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी प्रत्येक पोलीस पाटलास  प्रशंसापत्र दिले आहे. पोलीस पाटलांनी या पुढे सुध्दा चांगले काम करून प्रशासनाला सहकार्य करावे. 
 
पोलीस पाटील संघटनेच्यावतीने बोलताना वाळुंज गावाचे पोलीस पाटील मोहन इंगळे म्हणाले की, “सध्या सर्वच गावातील पोलीस पाटील उच्च शिक्षित आहेत.कायद्याची व जबाबदरीची जान असणारे आहेत. त्यामूळे शासनाने दिलेल्या सर्वच जबाबदऱ्या यापुढे सुध्दा सर्वच पोलीस पाटील पारपाडतील. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कौतुकामुळे आणखी जोमाने काम करण्याची स्पूर्ती आम्हाला मिळाली आहे. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत व यापुढे सुद्धा करू.” यावेळी जेजुरी पोलीस  स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
 
न्यूज अनकट प्रतिनिधी:  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा