पैठण ९ मे २०२४ : पैठण शहरात चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान देत चोरीचे सञ सुरु ठेवले आहे. कहर म्हणजे पोलिसांचा नाकावर टिच्चुन पोलिस वसाहतीमध्ये राहाणार्या पोलिसाच्याच घरात चोरट्यांनी सोने.चांदीसह नगदी रोख रकमेसह तिन लाखाचा डल्ला मारल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे
पैठण शहरात नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले असून जेथे रक्षकाचे घरच सुरक्षित नाही तिथे जनसामांन्याचे मालमत्ता सुरक्षितेचे काय? असा प्रश्न पैठणकर जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबद पोलिस सुञाकडुन मिळालेल्या मिहिती नूसार दि ५ ते ८ मे रोजी अश्विनी लाकाळ या पोलिस कर्मचारी शासकीय बंदोबस्त कामी बीड येथे गेले होते,
तर त्यांचे पती प्रविण लाकाळ हे पुणे येथे कामानिमित्त गेले होते. या दरम्यान पैठण पोलिस वसाहातीमध्ये राहाणार्या या दापत्याच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील लाॅकर उघडून त्यामधील ठेवले सोन्या.चांदीचे दागीने व रोख रखमेसह ३ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरुन नेले. प्रविण राजेंद्र लाकाळ वय ३२ रा.ह.मु.पो.पोलिस वसाहत पैठण यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पो.नि.संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाळी पोउनि मस्के हे करीत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : मनोज परदेशी