प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी
8 March Women’s Day : “मुलगी शिकली आणि प्रगती झाली” असा नारा आपण अनेक ठिकाणी लिहिलेला पहिलाच असेल, पण खरच आज महिला शिकून पुढे गेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. आज ८ मार्च दरवर्षी संपूर्ण जगभरात हा दिवस आंतराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे महिलांच्या हक्काचा, तिच्या संघर्षाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
पण हा दिवस इतका महत्वाचा का ? यामागचा इतिहास काय जाणून घेऊयात.


महिला दिन हा कामगार हकांच्या चळवळीतून निर्माण झाला. या दिवसाचा इतिहास १९०८ सालापासून सुरू होतो. जेव्हा अमेरिकेतील महिलांनी आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवला होता. त्यावेळी १५,००० हजार महिलांनी एकत्र येत कामाचे तास कमी व्हावेत, चांगले वेतन मिळावे आणि मतदानाचा हक्क मिळवा या मागणीसाठी न्यूयॉर्क शहरात मोर्चा काढला होता. त्यानंतर अमेरिकेतील सोशालिस्ट पार्टीने पुढच्या वर्षी लगेचच हा दिवस “राष्ट्रीय महिला” दिवस म्हणून घोषित केला. क्लारा झेटकिन (Clara Zetkin ) या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली. याचबरोबर या दिवसाला आंतराष्ट्रीय दिन बनवण्याची कल्पना देखील त्यांचीच होती.
८ मार्च रोजीच का हा दिवस साजरा केला जातो ?


१९१० मध्ये कोपेनहेगन येथे झालेल्या एका कामगार महिलांच्या आंतराष्ट्रीय परिषदेत ( इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वर्किंग वुमेन) हा मुद्दा उपस्थित केला गेला. या परिषदेत उपस्थित असलेल्या १७ देशांतील १०० महिलांनी एकमतान या मुद्याला पाठिंबा दिला.
सर्वात प्रथम १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांत पहिला आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं देखील त्याला अधिकृत मान्यता दिली. १९११ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं स्वीकारलेली पहिली थीम ही ‘भूतकाळाचं सेलिब्रेशन,भविष्याचं नियोजन’ अशी होती. यानंतर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतरित्या हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलांच्या हक्कांसाठी आणि सशक्ती करणासाठी जगभरात अनेक समाजिक, आर्थिक उपक्रम राबवले गेले.आजच्या युगात महिलांनी सक्षम असण फार गरजेच आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कडून सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. जस की लाडकी बहीण, नारी शक्ति वंदन इत्यादी. अनेक महिला अशा आहेत, ज्यांना दुसऱ्यांच्या दबावाखाली, समान वेतन, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा, सामाजिक बंधने अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
काय आहे २०२५ ची थीम :


या दिनाचे महत्व जास्तीत जास्त लोकांना समजून यावे यासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघाकडून विशिष्ट थीम आणि त्याच उदिष्ट ठरवले जाते. २०२५ या वर्षासाठी “सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता, सबलीकरण” अशी थीम असून पुढील पिढीला शाश्वत बादलासाठी सक्षम करण हे या थिमचे उद्दीष्ट आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकेतस्थळानं #AccelerateAction ही थीम निवडली आहे.