महिलेनं ९ महिन्यांच्या चिमुरडीसह रेल्वे खाली येऊन केली आत्महत्या…..

लोणी काळभोर, १६ डिसेंबर २०२०: लोणी काळभोर येथे एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली आहे. पुणे दौंड रेल्वेमार्गावर लोणी काळभोर च्या कोपऱ्यातून एका विवाहीतेनं आपल्या ९ महिन्याच्या बाळासह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान रेल्वे मार्गावर आई व लहानग्या चिमुरडीचे मृतदेह हे लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या रामाकृष्ण रसायन कंपनी जवळ आढळुन आले. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी पुण्याला पाठवले.

विवाहित मृत महिलेचे नाव शितल मखवाने असून ती २२ वर्षाची होती व शुभ्रा हे तिच्या त्या निरागस चिमुरडीचं नाव होतं. ही आत्महत्या का करण्यात आली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत महिलेच्या मामाच्या सांगण्यावरू आकस्मात मृत्यू ची नोंद पोलिसांनी केली आहे. तर संपूर्ण कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले आसून सर्व नातेवाईकांना याचा धक्का बसला आहे. तर या घटनेचा पुढील तपास हे पोलिस उपनिरीक्षक संदिप बोरकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा