सिल्लोड तालुक्यात तरुणीची आत्महत्या, या प्रकरणातील तरुणाची कारागृहात रवानगी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर २७ मार्च २०२४ : सिल्लोड तालुक्यामध्ये असलेल्या अंधारी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या याच गावातील युवक विजय तायडे या युवकास पोलिसांनी अटक करून हरसुल येथील कारागृहामध्ये याची रवानगी केली आहे.

या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन तरुणीस एकतर्फी प्रेमातून हा युवक वारंवार त्रास देत होता. यामुळेच या अल्पवयीन मुलीने कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे ही घटना घडलेली आहे. पोलिसांनी या युवकास अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल करून न्यायालयाने युवकाची हरसुल कारागृहात रवानगी केलेली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : सचिन साबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा