८ फेब्रुवारी २०२५ कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यात नागपूर येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला खेळणयाची संधी देण्यात आली. आता मालिकेतील दूसरा सामना ९ फेब्रूवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात सर्व चाहत्यांच्या नजरा किंग कोहलीकडे असणार आहे.ज्यात तो मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडू शकतो.
तसे पाहायला गेल तर, विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत १३९०६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सचिनने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १४ हजार धावा केल्या असून विराटला विश्वविक्रम मोडण्यासाठी आता फक्त ९४ धावांची आवश्यकता आहे. जर विराट कोहलीने कटकमध्ये ९४ धावा केल्या, तर या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा तो फलंदाज बनणार आहे.
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ३५० डावांमध्ये १४ हजार धावांचा
आकडा गाठला होता तसेच सध्या हा विक्रम त्याच्या नावावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकिर्दीत २८५ डाव खेळले असून त्यामध्ये त्याने ५८.१८ च्या सरासरीने १३९०६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने त्याच्या बॅटमधून ५० शतके आणि ७२ अर्धशतके झळकावली आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १८३ राहिली आहे. जर विराट कोहलीने ९४ धावा केल्या, तर ३०० पेक्षा कमी डावांत १४ हजार धावा करणारा जगातील पहिला फलंदाज तो बनणार आहे. त्यामुळे येणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर