प्रकल्पग्रस्तांना दिलासा! प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश

राज्यातील विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी धोम, कोयना, वीर धरण यांसारख्या विविध धरणांच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा आढावा घेतला.

प्रकरणे प्रलंबित न ठेवता, कायद्यानुसार पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले. यासाठी ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करून गावपातळीवर प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – चैतन्य पगारे