हैदराबाद: हैदराबाद बलात्कार प्रकरण देशभर गाजलं आणि त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमुळे देशभर वादळ निर्माण झालं. या प्रकरणातला एक आरोपी चिन्नाकेशवुलूची पत्नी गर्भवती असून तिने सरकारकडे ही मागणी केलीय. ती म्हणाले, माझा पती तर आता मारला गेलाय. तो काही परत येणार नाही. मात्र माझ्या मुलाला मी कसं सांभाळणार त्यामुळे सरकारने ही मदत करावी असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
या एन्काउंटरची चौकशी आता सुप्रीम कोर्टाची समिती आणि तेलंगणा पोलिसांची खास SIT करत आहे. या प्रकरणावरून देशभर रणकंदन माजलं असताना सुप्रीम कोर्टाने सर्वआरोपींचे शव जतन करण्यास सांगितले आहेत. त्यामुळे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलेले नाहीत.