NZ vs SA Semi Final Match Highlights: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांणी दारुण पराभव केला. यासह, आता न्यूझीलंड संघाने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ४ मार्च रोजी ४ विकेट्सने हरवले होते. आता न्यूझीलंड संघाचा अंतिम सामना भारताशी ९ मार्चला दुबईमध्ये खेळवला जाईल.
दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूजीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या ठिल्या उडवल्या. किवी संघाकडून रचिन रवींद्र आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी शानदार शतके झळकावली. रवींद्रने १०८ तर विल्यमसनने १०२ धावा केल्या. त्याचबरोबर ग्लेन फिलिप्सने ४९ धावा करत न्यूझीलंड संघाला ३६३ धावांपर्यंत पोहोचवले. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ही सर्वाधिक धावसंख्या होती.
या विक्रमी धावसंखेचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली राहिली नाही. त्यांनी २० धावांवर आपली पहिली विकेट्स गमावली. कर्णधार टेम्बा बावुमाने ५३ आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने ६९ धावांची शानदार अर्धशतक झळकावली, परंतु मधल्या षटकांमध्ये कोणीही मोठी भागीदारी करू शकले नाही. साऊथ आफ्रिकेकडून एकट्या डेव्हिड मिलरने १०० धावांची तूफान खेळी केली. तो शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी लढला. त्याने नाबाद खेळीत १० चौकार आणि ४ षटकारच्या जोरावर ६७ चेंडूत १०० धावा केल्या.
भारत-न्यूझीलंड अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे.
उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव केला आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना ९ मार्च रोजी दुबई येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर