उजनी धरणातून भीमानदीला ५००० हजार क्यूसेकनी विसर्ग सुरू

माढा, ११ ऑक्टोबर २०२०: उजनी धरणातून भीमा नदीला रविवारी दुपारी एक वाजता पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी व रविवारी उजनी जलाशयावरती जोरदार पाऊस पडल्याने भीमानदीत पाणी सोडण्यात आले आहे. १ ऑक्टोबरला भीमानदीचे पाणी बंद केले होते. परतीच्या जोरदार पावसामुळे उजनीची पाण्याची टक्केवारी वाढली आहे.

उजनीच्या वरची धरणे म्हणजे पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतील जवळपास ७ धरणे ९५ टक्के च्या पुढे आहेत, तर ९ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली असून बंडगार्डन व दौंडमधून उजनीत पाणी येण्याची शक्यता आहे. उजनी धरण सध्या १११ टक्के भरले असून एकूण पाण्याचा टीएमसी १२३.१५ टीएमसी झाला आहे. तर उपयुक्त पाण्याचा टीएमसी ५९.५० टीएमसी झाला आहे. तर दौंडमधून उजनीत ३४५८ क्यूसेकने पाणी येत आहे.

उजनीची सद्यस्थिती:

एकूण पाणी पातळी ४९७.३२० मीटर

एकूण पाणी साठा ३४८७.७१ दलघमी
( १२३.१५ टीएमसी)

उपयुक्त पाणी साठा १६८४.९० दलघमी
(५९.५० टीएमसी)

टक्केवारी १११.०५ %

येणारा विसर्ग:

दौंडमधून ३४५८ क्यूसेक

उजनीतून सोडलेला विसर्ग:

भीमानदी ५०००
वीजनिर्मिती १६००
सीनामाढा २२२
दहिगाव १०५
बोगदा ६००
कालवा १२००

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा