पुणे, ३१ ऑक्टोबर २०२० : नगरसेवक श्री उमेश गायकवाड यांच्या मार्फत दरवर्षी दिवाळीनिमित्त नागरिकांना फराळ वाटप करण्यात येते. नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या माध्यमातून प्रभाग क्र २१ या भागातील जवळपास १५००० कुटुंबाना रेशन किटचे वाटप व विविध सोसायटीमधील ५००० कुटुंबाना भेट वस्तू वाटप करण्यात येते व तसेच करोना काळात नागरिकांना अहोरात्र वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ आज खासदार गिरीष बापट व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते झाला.
या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीष बापट,मा मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे, राहुल कुल,दत्तात्रय शेकटकर, गणेश बिडकर,सरचिटणीस राजेश पांडे,श्रीनाथ भिमाले, बापू मानकर, योगेश पिंगळे, उमेश गायकवाड,आबा तुपे, दिनेश गायकवाड,यांच्यासह स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे