तांदुळवाडी येथे स्वयंशिक्षण प्रयोगच्या वतीने गरजवंतांना अन्नधान्य वाटप

तांदूळवाडी,दि.१३ मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच ठिकठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन वाढत चालले असल्याने गोरगरिब तसेच मजूर यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या चालू परिस्थितीमध्ये अनेक जण समोर येऊन होईल तशी मदत करत आहेत. लोकांनी केलेली मदत हीच एकमात्र गरजवंतांना आधार आहे.

गावातील परिस्थितीकडे लक्ष देत कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथे स्वयं शिक्षक प्रयोग संस्थेच्या वतीने आज दिनांक १३ मे रोजी गोरगरीब, विधवा, तसेच इतर गरजवंतांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. स्वयंशिक्षक संस्थेच्या कार्यकर्त्या संगिता राऊत, राधा नवनाथ डिकले, तसेच बी डी ओ सर पंचायत समिती कळंब, विस्तार अधिकारी शिंदे , तांदूळवाडी मधील ग्रामसेवक झगडे , सरपंच दिपाली नितीन काळे, उपसरपंच रवी काळे, शिपाई आश्रुबा लिमकर, पोलीस पाटील विलास काळे आशा अंगणवाडी कार्यकर्ती व सर्व ग्रामपंचायत चे सदस्य उपस्थित होते. सर्व ग्रामपंचायत टीमला हेल्थ कीटचे देखील वाटप करण्यात आली.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा