बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्याचा पद्मश्रीनं गौरव

अयोध्या : यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात अनेक व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अयोध्येतील मोहम्मद शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे. शरीफ हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही धार्मिक भेदभावाविना बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

मोहम्मद शरीफ यांच्या या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या कामाची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे. कोणाच्याही धर्मापेक्षा माणूस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्यांच्यासाठी मरणानंतरही माणसाचा सन्मान महत्वाचा असल्याने त्यांनी स्वत:ला या कामात गुंतवूण घेतलं आहे. मोहम्मद शरीफ यांच्या निरंतर सेवेची दखल घेऊन सरकारनेही त्यांना देशातील मानाच्या नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

२७ वर्षांपूर्वी सुल्तानपूरमध्ये माझ्या मुलाची हत्या झाली होती. त्यानंतर मला याबाबत एक महिन्यानंतर कळालं. या घटनेनंतर मी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कराचं काम सुरू केलं, असं मोहम्म यांनी सांगितलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा