‘इस्रो’च्या प्रमुखांची मोठी घोषणा; गगनयान लॉंचिंगवर तीन महिन्यांत होणार तीन मोठे प्रक्षेपण

नवी दिल्ली, १२ जानेवारी २०२३ : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी बुधवारी बंगळुरूला सांगितले, की ‘इस्रो’ने पुढील तीन महिन्यांत तीन मोठे रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे. या रॉकेटमध्ये स्मॉल सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (SSLV), लॉंच व्हेईकल मार्क-II (LVM-III) आणि पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (PSLV) यांचा समावेश आहे. गगनयानच्या प्रक्षेपणाबाबत सोमनाथ म्हणाले, की गगनयानची उड्डाण चाचणी एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकते. स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस आणि स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट या तीनदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर सोमनाथ पत्रकारांशी बोलत होते, की जानेवारी आणि फेब्रुवारीच्या अखेरीस आम्ही SSLV लाँच करण्याचा विचार करीत आहोत. त्यानंतर पुढील मिशन LVM-३ असेल. त्यानंतर PSLV पुन्हा व्यावसायिक उद्देशासाठी प्रक्षेपित केले जाईल. पुढील तीन महिन्यांसाठी हे तत्काळ लक्ष्य आहे.

गगनयानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, की गगनयानची उड्डाण चाचणी एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकते. गगनयान हे अवकाशात क्रू पाठविण्याचे भारताचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. देश अजूनही अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता (SSA) आणि अंतराळ वाहतूक व्यवस्थापनामध्ये (STM) बाल्यावस्थेत आहे आणि एजन्सी या क्षेत्रात क्षमता विकसित करण्याचा विचार करीत आहे. इस्रो देशात निरीक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी तांत्रिक क्षमता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामुळे जगात परस्पर आदर निर्माण होण्यास मदत होईल. भारताची SSA आणि STM च्या या विशिष्ट क्षेत्रात रुची वाढत आहे. आम्हाला भारतात नागरी आणि सुरक्षा या दोन्ही बाबींमध्ये क्षमता विकसित करायची आहे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले.

‘मजबूत, परस्पर आदर मिळणार नाही’ या विषयावर शहरात आयोजित कार्यशाळेत ते पत्रकारांशी बोलताना ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, की भारत आणि इतर देशांदरम्यान परस्पर डेटा आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी, यासाठी परस्पर आदर राखणे हा यामागचा उद्देश आहे. या कार्यशाळेत या क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जगातील विविध भागांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा