पुणे ९ फेब्रुवारी २०२५ : शहरात मेट्रोचे काम सुरू असल्याने आधीच वाहतुकीची मोठी समस्या आहे. त्यात भर म्हणजे, अनेक वाहनचालक नो पार्किंग झोनमध्ये गाड्या पार्क करत आहेत. यामुळे रस्त्यावर आणखी कोंडी वाढत आहे आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


विशेष म्हणजे, या गंभीर समस्येकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. नियमांचे उल्लंघन होत असतानाही वाहतूक पोलीस आणि महापालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
“रस्त्यावरची जागा आधीच कमी आहे, त्यात चुकीच्या पार्किंगमुळे गाड्या चालवणे मुश्किल झाले आहे. प्रशासन फक्त बघत राहणार आहे की काहीतरी ॲक्शन घेणार?” असा सवाल एका स्थानिक नागरिकाने विचारला.


वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी नो पार्किंग झोनमध्ये गाड्या उभे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे खूप गरजेचे आहे. नाहीतर पुणेकरांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे