अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून दोन लाखांचे बक्षीस जाहीर, दोन महिन्यानंतरही आरोपी मोकाट

अमरावती, १३ सप्टेंबर २०२२ : अमरावती मध्ये झालेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी NIA कडून आपल्या हालचालींना गती देण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ ​फिरोज अहमदवर NIA ने बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणाऱ्यास दोन लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर, घटनेला दोन महिने होऊन गेले तरी आरोपीचा थांगपत्ता मिळत नाही. त्यामुळे आता NIA कडून दोन लाख रुपये बक्षीसाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यामधील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम असल्याची माहितकी मिळाली आहे.

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व बाजूने चौकशी सुरू केली. हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला अटक करण्यात आली. परंतु अजूनही एक आरोपी फरार आहे. आता या प्रकरणी NIA ने आपल्या तपासाला गती दिली आहे. आरोपीची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा