नवी दिल्ली : भारताची फुलराणी अर्थात आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला. लिने होजमार्क केर्ज्सफेल्ड या डेन्मार्कच्या खेळाडूकडून तिला पराभव स्वीकारावा लागला.
डेन्मार्कच्या लिने होजमार्क केर्ज्सफेल्डने महिला एकेरीत सायना नेहवालचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. सायनाच्या या पराभवासह या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
सायनाला या मोसमामध्ये पहिल्या मलेशिया मास्टर्स या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत देखील पराभव सिकराव लागला होता. त्याचप्रमाणे, इंडोनेशिया मास्टर्समधून ती पहिल्याच फेरीतून बाहेर पडली होती.