नाशिक, दि ३ जून २०२० : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी (दि.२) रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील सर्व भागांसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिककरांना उष्णतेपासून दिलासा मिळला.
मात्र, कळवण तालुक्यातील नांदुरी ते सप्तश्रृंगी देवीच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या घाटात दरड कोसळली आहे. सुदैवाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहन नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पावसाळ्यात अनेक वेळा या दरडी कोसळत असतात. आज कोसळलेली दरड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: